विविध स्पर्धांचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त 13 मे व 14 मे 2023 रोजी तरंदळे बौद्ध वाडी मध्ये संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.13 मे रोजी सकाळी 9.वाजता द्धवजारोहन,सकाळी 10 वाजता लहान मुलाचे स्पर्धा,11 वाजता वक्तृत्व स्पर्धा ,दुपारी 2 वाजता महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या.रात्री 9.30 वाजता धम्म दीप हा मानवतेचा आदर्श बौद्ध विकास मंडळ व रमाई महिला मंडळ यांचे सांस्कृतिक व भिमगिते कार्यक्रम पार पडला.रात्री 11 वाजता आदर्श बौद्ध विकास मंडळ निर्मित डॉक्टर विठ्ठल गाड लिखित. दिग्दर्शक किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाने धमाल,तुफान,कौटुंबिक,हृदयस्पर्शी,मालवणी ऐंकाकीका आम्ही मालवणी ऐंकाकिका पार पाडण्यात आली.14 मे रोजी सकाळी 10 वाजता लहान मुलांचे निबंध स्पर्धा दुपारी 3 वाजता स्थानिक मुलांचे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.रात्री 9 वाजता प्रतिमा पूजन,बुध्द पूजापाठ,घेवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी तरंदळे सरपंच सुशिल कदम,जानवली सरपंच अजित पवार, माजी सरपंच सुधीर सावंत,तंटामुक्त समिती अध्यक्ष जयसिंग नाईक,सामाजिक कार्यकर्ते सागर सावंत भोसले,जिल्हा महासचिव अशोक कांबळे,कोषाध्यक्ष,नंदकुमार कासले, व्ही.जी.कदम,विशाल कदम, भरत कदम,ग्रामपंचायत सदस्य नेहा घाडीगावकर उपस्थित होते.कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव प्रशांत कदम यांनी केलं.आभार वनिता कदम यांनी मानलं.रात्री 11 वाजता जिल्हा स्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात पार पाडण्यात आली.स्पर्धा 2 गटात पार पाडण्यात आली.दोन्ही गट मिळून 30 स्पर्धक आले होते.लहान गट प्रथम क्रमांक.अभंग रगजी.2.द्वितीय क्रमांक लावण्या कारेकर.3.तृतीय क्रमांक.निधी खडपकर,4.प्रथम उत्तेजनार्थ.दुर्वा पावसकर,5.द्वितीय उत्तेजनार्थ.अपूर्वा एकावडे मोठा गट प्रथम क्रमांक.दीक्षा नाईक, द्वितीय क्रमांक.जयेश सोनुरलेकर, तृतीय क्रमांक. प्रीयेश पवार विभागून.मृणाल सावंत, प्रथम क्रमांक.नेहा जाधव, द्वितीय उत्तेजनार्थ.पूर्वा मेस्त्री.परीक्षक म्हणून सिनेअभिनेते सुदिन तांबे व अतुल कदम यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन म्हणून संदेश तांबे यांनी काम पाहिले.सर्व स्पर्धकांचे, परिक्षकांचे,सूत्रसंचालक, व सर्व देणगी दारांचे आभार आदर्श बौद्ध विकास मंडळ तरंदळे यांच्या वतीने मानण्यात आले.