अन्यथा इलेक्टोरल बॉन्ड देणाऱ्यांची नावे जाहीर करू;दिला इशारा
संजय राऊत ने ठाकरे बाप लेकाने मुंबईला कसं लुटलं यावर कधीतरी चर्चा करावी
कणकवली (प्रतिनिधी) : कालच्या इंडिया आघाडीच्या पूर्ण कार्यक्रमांमध्ये जो काही केजरीवालांसाठी कार्यक्रम घेतला असे म्हटले त्या ठिकाणी केजरीवालांचे लावलेले बॅनर देखील आघाडीच्या नेत्यांनी काढायला लावले.त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंची काय इज्जत होती ते राहुल गांधींनी स्वतःच्या तोंडाने दाखवली आहे. आणि इलेक्टोरल बॉन्ड ची चर्चा संजय राऊत करत होता उबाठा ला जे इलेक्टोरल बॉन्ड च्या माध्यमातून पैसे आलेले आहे त्याची देखील चर्चा झाली पाहिजे. असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.ते कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते.
त्या देणगीदार कंपनी नक्की कोण आहेत. त्यांची यादी आमच्याकडे उपलब्ध असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.उद्धव बा. ठाकरे पक्षाचा महापौर असतानाच्या काळात ज्यांना ज्यांना इलेक्टोरल बॉन्ड च्या माध्यमातून पैसे दिलेले आहेत त्यांनी मुंबई महापालिकेचे किती टेंडर भेटलेले आहे.कोविडच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कोणत्या कंपन्यांना किती टेंडर भेटले. याची चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे इलेक्टोरल बॉन्ड चा हिशोब दाखवण्याची हिंमत उबाठा ने करावी असे आवाहन यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले.
उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये बसून एक फार मोठा जोक केला की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना मणिपूर मध्ये पाठवण्यासाठी स्वतः तिकिटाचा आणि राहण्याचा खर्च करणार असे उद्धव ठाकरे सांगतात पण ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कधी लॉन्ड्री चे पैसे, स्वतःच्या अंतर्वस्त्र कधी विकत घेतले नाही किंवा देवाऱ्यात असणारी फुले कधी विकत घेतली नाही ज्यांना कधी स्वतःच्या खिशातून एक रुपया बाहेर काढायची सवय नाही तो माणूस सांगतो की देवेंद्र फडणवीस यांना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार ही हास्यास्पद गोष्ट आहे आणि मणिपूर फाइल्स काढण्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी दिशा सालीयन ची फाईल चित्रपट देखील बाहेर काढा हा चित्रपट जोरात चालेल आणि मुख्य भूमिकेमध्ये तुमच्या मुलाला एकत्र म्हणून घ्या कारण दिशा सालीयन फाइल्स या चित्रपटाचा मुख्य कलाकार आणि सूत्रधार हा तुमचा मुलगाच आहे
संजय राजाराम राऊत यांना पुढे अजून कोणते चित्रपट काढायचे असतील तर गोरेगावचे किंवा न्युझीलँड हाऊस फाइल्स या नावाचे चित्रपट काढा मग कळेल लोकांचे किती मनोरंजन होत आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल आहे पंतप्रधानांची सुरक्षा आणि प्रोटोकॉल या निवडणुकीच्या नियमांच्या अनुसारच केले जातात त्यांच्या दौऱ्यांचा खर्च किती आहे हे निवडणूक आयोगाला जास्त माहिती आहे तिकडच्या होऊ घातलेल्या कारकुणाला माहित नाही. मुंबईमध्ये या बाप बेटा सरकार ने मुंबई महापालिकेच्या नावाने मुंबईला अक्षरशा विकायला काढले होते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याअगोदर तुझा आणि तुझ्या मालकाचा आणि मालकाच्या मुलांनी मुंबईला कसं लुटलं यावर कधीतरी अर्धा तास चर्चा करा मग सर्वांना कळेल
विनायक राऊत यांच्या खळा बैठकांवर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, खळा बैठक आणि एस एस पी एम मेडिकल कॉलेजच्या भ्रष्टाचाराचा काय संबंध ? आरोप करण्यापेक्षा एस एस पी आमच्या खळ्यामध्ये येऊन बसा वाटल्यास तेथील जागेची स्वच्छता आम्ही करून देतो असा टोला देखील आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांना लगावला आहे. तर एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि या संस्थेने कोरोना काळामध्ये लोकांची जी सेवा केली आणि जो काय आधार दिला तो उद्धव ठाकरे यांच्या सरकार आणि आरोग्य यंत्रणा तेव्हा देऊ शकली नाही. तेव्हा जिल्ह्याच्या आणि कोकणच्या लोकांचे मत आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जे स्वतः तेव्हा मुख्यमंत्री होते स्वतःची सत्ता होती ते तेव्हा टीका करण्यापलीकडे काही करू शकले नाही लोकांना आदर देऊ शकले नाही त्यांनी आमच्यावर टीका करू नये.खळ्यामध्ये बसून तुम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी चा विकास काय केला हे लोकांना तरी सांगा अन्यथा 4 जून नंतर रस्त्यावरच बसायचं आहे असा इशारा देखील दिला.