वैभववाडी (प्रतिनिधी) : ईलक्ट्रोल बाँड च्या माध्यमातून भरघोस काळे धन घेऊन, भारताचे बंदर ,विमानतळ, , अनेक जमिनी व उपक्रम ,एका पक्षांनी एका ,”अडाणी “च्या घशात घातलेले मतदारांनी याची देही याची डोळा आधीच पाहिलेले आहे. आणि तसेच ,आपल्या देशात असेही लोकप्रतिनिधी आहेत , जे इतके “अडाणी ” आहेत की, त्याना पत्रकारांनी किंवा विरोधकांनी काही प्रश्न विचारले , तर त्यांना तो प्रश्न ही कळत नाही, आणि त्याचे उत्तर ही सुचत नाही. तरी ही भोळ्या मतदारांनी , यांना आपले समजून ३०-३५ वर्षे प्रतिनिधित्व देऊन पाहिले पण शेवटी ,आपल्या भागाचा विकास झाला नाही , मात्र प्रत्येक निवडणुकी नंतर, त्यांची संपत्ती कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. आता ,असे त्यांनी शपथ घेऊन ही लोकान समोर आणले आहे. ह्या “अडाणी” ना , पापातून केलेली आप कमाई वाचवण्यासाठी कायम सत्तेचा आश्रय घ्यावा लागतो. आणि अनेक पक्षाची पायधूळ झाडावी लागते.हे ही भोळ्या जनतेनी आपले म्हणून समजून घेतले असते. आणि माफ ही केले असते.परंतु, सन २०२४ ची लोकसभा निवडणुक ही महामारी व महागाई नी “हाथ”-घाई वर आलेल्या मतदारांसाठी व बेरोजगारी रोज भर पडणाऱ्या ,त्याचे मुलाचे भवितव्यासाठी फार निकराची आहे. कारण, यावेळी चूक झाली तर , त्याचे मुलांचे भवितव्याचा ही निखारा होणार आहे आणि असा चुकून येणारा निकाल ,त्यांचे भविष्याचा ही निकाल लावणारा असणारा होणारा आहे. त्या मुळे , मतदान हे “दान” आहे.आणि ते करताना, त्याची किंमत करू नये.म्हणजे भविष्यात,त्याची किंमत ही आपल्या भावी पिढी ला आणि महाराष्ट्ला ही मोजायला लागू नये. आता , आपली सत्ता अबाधित यावी, यासाठी दोन्ही “अडाणी” चे पैसे मतदारांना चारले जातील .तेव्हा ५०० असो का ५००० असो , यात आपले मुलांचे भवितव्य पुन्हा “चाराण्यास ” विकायचे का? आणि भ्रष्टाचाराची “साथ” आपले कडूनच वाढू द्यायंची का? याचा विचार मात्र ७ मे ला ७ वेळा करूनच, यावेळी मतातून कोणाला “साथ ” द्यायची आणि कोणाला “लाथ ” द्यायची, हा मतदारांनी निश्चय करूनच एकवेळ आपल्यावर लादलेल्या गरिबीची कळ काढावी , EVM ची कळ दाबावी . आणि क्रांतीची “मशाल” भ्रष्ट कारभारा विरोधी पेटवावी.