फोंडाघाट घाटपायथ्याशी वाहन चालकांची वस्तु सेवा कर आणि ई- वे बील्स तपासणी मोहिमेचा धडाका
फोंडाघाट (प्रतिनिधी) : घाट माथ्यावरून ट्रान्सपोर्ट ट्रक- वाहनातून येणाऱ्या मालाचे ई -वे बिल्स आणि वस्तू सेवा कराची तपासणी मोहीम, अचानक घाट पायथ्याशी आज सकाळी सहा वाजल्यापासून राज्यकर उपायुक्त अभिजीत पोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. येणारी- जाणारी वाहने थांबवुन पथकातील सदस्यांनी त्यांची ई – वे बिल आणि त्यातील माल तसेच भरलेला वस्तू सेवा कर (जीएसटी) यांची पडताळणी केली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ट्रान्सपोर्ट ट्रक वाहने धारकांमध्ये खळबळ माजली .
याबद्दल विचारता, राज्य सेवा कर विभागाचे सिंधुदुर्ग उपायुक्त अभिजीत पोरे म्हणाले, दिवसेंदिवस वाहन चालकांमध्ये बदलते नियम, वस्तू सेवा कर आणि त्याबाबतचे कागदपत्र सोबत ठेवण्याबाबत, ट्रान्सपोर्ट धारक आणि ट्रक-वाहन चालक यांचे मध्ये सतर्कता पाळली जात आहे. ही सकारात्मक बाब आहे. त्यामुळे कोणीही वस्तू सेवा कर आणि ई -वे बिल्स कायदा नियमांचे उल्लंघन न करता काटेकोर रहावे व कारवाई टाळवाई टाळावी. यासाठी ही अचानक तपासणी मोहीम सर्वत्र जिल्ह्यात राबविली जात आहे ..
या अचानक मोहिमेची माहिती उतारपेठ असलेल्या फोंडाघाट बाजारपेठेत अथवा सक्षम फोंडाघाट व्यापारी संघाला नसल्याबद्दल व्यापारी वर्ग मध्ये कमालीचे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे…












