हर्षद धुमाळे, अजय कदम यांची कणकवली कन्झ्युमर्स सोसायटी संचालकपदी बिनविरोध निवड

चेअरमन संदीप नलावडे, व्हाईस चेअरमन अण्णा कोदे यांनी नूतन संचालकांचे केले अभिनंदन

कणकवली (प्रतिनिधी) : सोसायटी संचालक रवींद्र मुसळे व सखाराम जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक घेण्यात आली यात विशेष मागास प्रवर्गातून हर्षद धुमाळे व अनुसूचित जाती जमाती मधून अजय कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी रविकिरण खांडेकर कंझ्युमर्स सोसायटी चे चेअरमन संदीप नलावडे, व्हा. चेअरमन अण्णा कोदे, सेक्रेटरी सुनिल महाजन, संचालक महेश नार्वेकर, स्वरूप सापळे, पूजा माणगावकर, शैलेश डिंचोलकर, संतोष पारकर, रघुनाथ कोरगावकर व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!