अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल ची एकदिवसीय बांधावरची शाळा संपन्न
शेती ही विद्यार्थ्यांची जिवनशैली बनली पाहिजे -कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे
वैभववाडी (प्रतिनिधी) : शाळेतील अभ्यास खेळ व आजच्या डिजिटल युगात मोबाईल व कम्प्युटरवर रमणाऱ्या मुलांच्या हातामध्ये भाताची रोपं आल्यावर शेतीतील कामाचा तो मुलांचा आनंद अवर्णनीय असाच होता एरवी मैदानात खेळणारी ही मुलं चिखल माती तुडवीत प्रत्यक्ष चिखलात उतरून शेतीच्या आनंद घेताना शिकलातून उमगलेल्या कमळा प्रमाणेच भासत होती निमित्त होतं ते ‘बांधावरची शाळा’ या एक दिवस उपक्रमाचे.
बांधावरची शाळा या उपक्रमांतर्गत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे विद्यालय वैभववाडी या शाळेच्या शिक्षक व मुलांनी वाभवे येथील शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष तरवा काढणे व भात लावणे, चिखल करणे आधी शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेती विषयी माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जातो. शेती ही विद्यार्थ्यांची जिवनशैली बनली पाहिजे असे मत यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केले.
प्रशालेच्या विद्यार्थ्यांबरोबर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्हि.एस.मरळकर, प्रशालेचे एन.सी.सी.विभाग प्रमुख एस.टी.तुळसणकर, आर.एस.पी. अधिकारी एम.एस.चोरगे., शिक्षिका पी.पी.सावंत, एस.व्ही.भोसले, एस.ए.सबनीस तसेच शिक्षकेतर कर्मचारी आर.एम.फुटक, एम.आर.रावराणे हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते.