वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी आयटीआय नवीन इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व आयटीआय चे प्राचार्य यांना दिले आहे. आरटीआय प्रलंबित इमारती संदर्भात वैभववाडी आयटीआयचे प्राचार्य व लोकप्रतिनिधी यांनी आमदार नितेश राणे व पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेतली. आयटीआय चे प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावले जातील असे आश्वासन यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. यावेळी मंडल अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, शिवसेना वैभववाडी अध्यक्ष संभाजी रावराणे, अरविंद रावराणे, प्राचार्य नितीन पिंडकुरकर, शिल्प निदेशक अमोल राणे व पदाधिकारी उपस्थित होते.