वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने पथनाट्य सादर

पथनाट्यातून आपत्तीचे धोके व घ्यावयाची काळजी याबाबत कलाकारांनी केले मार्गदर्शन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडीत तहसीलदार कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व धोके त्यावरील उपाय, आपत्तीत घ्यावयाची काळजी , संयम, अफवा,भीती, सावधानता, ज्ञान, सहकार्य ही आपत्ती व्यवस्थापनाची सहा सुत्रे, आपत्तीचे प्रकार या सर्व गोष्टींबाबत पथनाट्यातून कलाकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या पथनाट्यात अजय कलठोणे, इंद्रसिंग राजपूत, निलेश खेडेकर, निलेश सातपूते, सनी क्षिरसागर, काव्या कलठोणे, विशाखा गव्हांडे या कलाकारांनी आपल्या अभिनयाने विनोदी संवादातून उपस्थित विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. वैभववाडी चे तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपत्ती व्यवस्थापन जनजागृती पथनाट्य कार्यक्रम वैभववाडीतील शाळांमध्ये आज राबविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पी.एम.पाटील, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील. पी.बी.पवार, प्रशालेचे आर.एस.पी.अधिकारी एम.एस.चोरगे.आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!