अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर कणकवलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लाेष

कणकवली (प्रतिनिधी) : अजित पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशी घोषणाबाजी करीत कणकवलीत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर अन्य ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगरसेवक अबीद नाईकांसह कार्यकत्यांनी पटवर्धन चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, उपाध्यक्ष विलास गावकर, सुभाष उर्फ बाबू सावंत अनिस नाईक, शहराध्यक्ष इम्रान शेख, उपशहराध्यक्ष अमित केतकर, गणेश चौगुले, केदार खोत, ग्रा. पं. सदस्य सतीश पाताडे, युवक राष्ट्रवादीचे कणकवली शहराध्यक्ष निशिकांत कडुलकर, बालू मेस्सी राजू सावंत, नितीश सावंत यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अजित पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा विजय असो अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी करत कमवती पटवर्धन चौक दणाणून सोडला.

राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत – अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून अन्यही ८ आमदारांनी मंत्रीपदाचे शपथ घेतली आहे याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची उमेद वाढली असून पक्षाच्या माध्यमातून आम्ही अधिक जनतेची सेवा करणार आहोत अजित पवारांच्या या निर्णयामुळे विकासाची संधी प्राप्त झाली असून सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी एकसंघ राहील असे सांगतानाच सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीत दोन गट पडणार नाही, असा विश्वास अबीद नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

error: Content is protected !!