कणकवली (प्रतिनिधी) : मागील 25 वर्षांत वाघेरी गावच्या नदीपात्रात सिलिका वाळू वॉशिंग प्लांट मशील धुतलेल्या सिलिका वाळूचा चिखल सोडून गावाचा भकास करणाऱ्यांना विकासावर बोलण्याचा अधिकार नाही अशी अप्रत्यक्ष टीका माजी सभापती मनोज रावराणेंवर युवासेना विभागप्रमुख सिद्धेश रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. प्रसिद्धीपत्रकात सिद्धेश रावराणे यांनी पुढे म्हटले आहे की कोणत्याही गावच्या विकासात त्या गावातील लोकांचे योगदान मोठे असते. एखाद्या लोकप्रतिनिधीला गावातून सर्वाधिक मतदान करुनही त्यांचे दुर्लक्ष होत असेल तर मतदारांनी विचार करावा..गेली वीस पंचवीस वर्षे वाघेरी गावातील नदीत वाळूचा चिखल सोडून या नदीला भकास करणाऱ्यांना विकासावर बोलण्याचा अधिकार नाही. या भिषण समस्येवर कधी शासन दरबारी आवाज उठवला ते जाहीर करावे..
वाघेरी ग्रामपंचायत गेली पंधरा वर्षे ताब्यात असताना काय विकास झाला तो जिल्ह्यातील लोकांनाच नाही तर राज्य स्तरावर माहीत आहे. त्यांच्या पक्ष वरिष्ठांनी गावातील भ्रष्टाचारी वृत्तींना पाठिंबा देण्यापेक्षा चांगल्या सामाजिक विकासाला पाठिंबा दिला असता तर मतदारांनी यावेळी बदल केला नसता.. त्यामुळे वाघेरी गावच्या समस्येत भर घालणाऱ्या आणि गावात सामाजिक विषमता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी.. गावातील ठेकेदारी घेतलेल्यांनी वाघेरी गावच्या विकासावर बोलू नये.. वाघेरी गावचा विकास कोणी केला हे आता ग्रामस्थ ओळखून आहेत. त्यामुळे पैशाचं बळ सर्वच ठिकाणी चालत नाही.. आगामी निवडणुकींतून याची प्रचिती येईल.. असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.











