कुसुर मध्ये शॉर्ट सर्किट ने घराला लागली आग

लाखाचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली

वैभववाडी (प्रतिनिधी) : कुसूर खालची बौध्दवाडी येथील सुनीता नारायण कांबळे यांच्या घराला शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत  सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

सुनीता कांबळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच माणसे राहतात. रविवारी रात्री जेऊन झाल्यावर सगळे झोपले होते. दरम्यान मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली. गाड झोपेत असलेल्या कांबळे कुटुंबियांना बाजूला असलेल्या शेळ्याच्या गोठ्यातून मोठ मोठयाने शेळयांच्या ओरडण्याचा आवाजाने जाग आली. जागे झाल्यानंतर घराला आग लागल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे वाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत,  घरातील माणसांना तसेच गोठ्यातील शेळ्यांना बाहेर काढत आग विजवण्याचा प्रयत्न केला. शर्थीच्या प्रयत्नाने ग्रामस्थांनी घरातला लागलेली आग विजवली. त्यामुळे पुढचा अनर्थ टाळला आहे.

याबाबत तलाठी शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

error: Content is protected !!