आमदार नितेश राणे व नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्या हस्ते प्रवाशी निवारा शेडचे उद्धघटन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे –  वैभववाडी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी स्वखर्चातून बसस्थानकात बांधलेल्या प्रवासी निवारा शेडचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. वैभववाडी बसस्थानकात अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून, सामाजिक बांधिलकी जोपासत वैभववाडी बसस्थानकच्या शेजारीच प्रवाशांना बसवण्यासाठी सुसज्ज प्रवासी निवारा शेड उभी केली आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून बसस्थानक परिसरात काॅंक्रीटीकरण चे काम पूर्ण झाले आहे. तसेच निवारा शेड उभी राहिली आहे. सुसज्ज बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी आज सज्ज आहे. त्यातच नेहा माईणकर यांनी आणखी एक स्वखर्चातून निवारा शेड बांधल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. आमदार नितेश राणे यांनी नेहा माईणकर  यांचे कौतुक केले. उपस्थित प्रवाशांनी आमदार नितेश राणे व नेहा माईणकर यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, माजी सभापती अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, महिला अध्यक्षा प्राची तावडे, सुनील रावराणे, बबलू रावराणे, सुभाष रावराणे, संताजी रावराणे, अंकित सावंत, शिवाजी राणे, दीपक माईणकर, किशोर दळवी, रामचंद्र बावदाने, वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे, अविनाश दळवी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!